भावना आचरेकर ठरल्या मिसेस मीरा भाईंदर

| पनवेल | वार्ताहर |

रिबेल इंडिया प्रोडक्शनतर्फे रविवारी (दि.25) मीरा-भाईंदर येथील लता मंगेशकर नाट्यगृहात पार पडलेल्या मिस्टर आणि मिसेस मीरा-भाईंदर स्पर्धेत भावना आचरेकर या विजेता पदाच्या मानकरी ठरल्या आहेत. स्टार प्लस वहिणीवर सुरु असलेल्या ‘अनुपमा’ या मालिकेतील अभिनेता आशिष महाल्होत्रा यांच्या हस्ते भावना यांना विजेता पदाचा मुकुट देण्यात आला. रिबेल इंडिया प्रोडक्शन कंपनीतर्फे आयोजित या स्पर्धेत 5 पुरुष आणि 15 महिला स्पर्धेकांनी भाग घेतला होता. चालणं, वेशभूषा, हसणं, आणि प्रेक्षकापुढे स्वतःला कशा रीतीने सादर करता यावर या स्पर्धेचे विजेतेपद ठरवण्यात आले असल्याने स्पर्धेच्या विजेत्या भावना आचरेकर यांच सर्व स्थरातून कौतुक होत आहे. भावना आचरेकर या एक प्रसिद्ध पेस्ट्री शेफ असून, ओम क्रीशन्स संस्थेच्या माध्यमातून त्या मेन्टॅली चायलेंज मुलांसाठी काम करतात.

Exit mobile version