जांभुळपाडा प्राथमिक शाळेच्या इमारतीचे भूमीपूजन

| उरण | वार्ताहर |
प्राथमिक शाळा या संस्काररुपी विद्यार्थी घडविण्याचे काम करत आहेत. अशा जीर्ण झालेल्या जांभुळपाडा प्राथमिक शाळेच्या इमारतीला पुनर्जीवित करण्याचे काम चिर्ले ग्रामपंचायतीचे मा. सरपंच सुधाकर पाटील आणि त्यांचे सुपुत्र समीर पाटील या पितापुत्रांनी दीपावलीच्या मुहूर्तावर आपल्या आर्यन ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून स्वखर्चाने हाती घेतले आहे, ही अभिमानाची बाब आहे, असे गौरव उद्गार मा. सभापती नरेश घरत यांनी व्यक्त केले.

चिर्ले ग्रामपंचायत हद्दीतील जांभूळपाडा येथील जीर्ण झालेल्या प्राथमिक शाळेचा जीर्णोद्धार करण्याचे काम जांभुळपाडा ग्रामस्थांच्या मागणीतून चिर्ले गावचे माजी सरपंच सुधाकर पाटील व समीर सुधाकर पाटील यांनी स्वखर्चाने आपल्या आर्यन ग्रुप ऑफ कंपनीच्या माध्यमातून हाती घेतले आहे. अशा नव्याने उभारण्यात येत असलेल्या शाळेच्या चार खोल्यांच्या इमारतीचा भूमीपूजन समारंभ दीपावलीच्या मुहूर्तावर रविवारी (दि.23) ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी मा. सभापती नरेश घरत हे बोलत होते.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रामस्थांनी सुधाकर पाटील, समीर पाटील यांचा नागरी सत्कार केला. यावेळी सरपंच प्रियांका मढवी, कविता पाटील, एन.डी. पाटील, प्रभाकर पाटील, शाळा कमिटी अध्यक्ष महेश पाटील, दत्ता घरत, बळीराम मढवी, भरत घरत, अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य शरद घरत, मधुकर मढवी, जगदीश पाटील, सह ग्रामस्थ, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.

Exit mobile version