| तळा | वार्ताहर |
म्हसळा तालुक्यातील घोणसे म्हशाची वाडी येथे पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या सूर्योदया फाऊंडेशनच्या अर्थसहाय्याने नैसर्गिक पाण्याची साठवण टाकी व पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. या कामाचे भूमीपूजन म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या हस्ते पार पडले. या कामासाठी सामाजिक कार्यकर्ते कृष्णा महाडिक यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाप्रसंगी गावाचे मुंबई अध्यक्ष सचिन खेडेकर, स्थानिक अध्यक्ष रतिश पवार, महिला अध्यक्षा अश्विनी घोले यांसह नवतरुण मित्रमंडळ, रेमाई महिला बचत गट व म्हशाची वाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.