वैद्यकीय महाविद्यालयाच्या भूमीपूजन सोहळ्यास सुरूवात

खासदार शरद पवार यांचे आगमन

। अलिबाग । वार्ताहर ।
उसर ता. अलिबाग जि. रायगड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वापचार रूग्णालय या प्रशासकीय इमारतीच्या भूमीपूजन सोहळ्याच्या भूमीपूजन कार्यक्रमास सुरूवा झाली असून सोहळा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार आहेत. त्यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या सोहळ्याला राष्ट्रीय लोकनेते, राज्यसभा खासदार शरद पवार यांनी हजेरी लावली आहे. तसेच या सोहळ्यासाठी उपमुख्यमत्री अजित पवार हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी होणार असून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमितराव देशमुख, रायगड जिल्हा राष्ट्रवादी अध्यक्ष सुरेश लाड आणि खा. सुनील तटकरे, पालकमंत्री आदीती तटकरे, आ.अनिकेत तटकरे, आ.बाळाराम पाटील, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी उपस्थिती लावली आहे.

Exit mobile version