खोपोलीत विकासकामांचे भूमिपूजन

। खोपोली । प्रतिनिधी ।
खोपोलीतील प्रभाग क्र.3 चे विद्यमान नगरसेवक किशोर पानसरे यांनी विकासात्मक कामे करण्यामध्ये सातत्य ठेवत मागील पाच वर्षात मोठ्या प्रमाणात निधी आणणत विकासकामे केली असून मोहोनवाडीतील युवा उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मुंडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत 22 लाखांचे अंतर्गत रस्त्यांचे भूमिपूजन नगरसेवक किशोर पानसरे यांनी केले आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी शहरातील सामाजिक कार्यकर्ते अकाश सताने, प्रशांत तांबे, आनंद मर्चंडे, दिनेश मोरे, सरफराज पाटील, रोहीत, आनंद चव्हाण, सुनिल चव्हाण, आदर्श बेंबडे, सनिज मांडलेकर, रुपेश गायकवाड, ठेकेदार भरत वाघुले आदी उपस्थितीत होते. जून महिन्यांपासून मुसळधार पावसामुळे येथील रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दूरावस्थामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत असल्याने ही अडचण दूर करण्यासाठी पानसरे यांनी भरीव निधी उपलब्ध करुन दिल्यामुळे स्थानिक नागरिकांनी नगरसेवक पानसरे यांचे आभार व्यक्त केले.

Exit mobile version