नचिकेताज हायस्कूलचे भूमिपूजन

। आगरदांडा। वार्ताहर ।
नचिकेताज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज विहूर येथील इंग्रजी माध्यम शाळेचा नूतन इमारतीचे भूमिपूजन मुरुड नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते मंगेश दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.सदरील शाळा विहूर येथे होती.परंतु आता मुरुड शहराच्या जवळील दस्तुरी नाका आयटीआय जवळील भागात सदरील शाळेच्या नवीन इमारतीचा पायाभरणी समारंभ नुकताच करण्यात आला आहे.
यावेळी संचालिका मुग्धा दांडेकर,विश्‍वस्त नतीन पवार नगरसेवक अविनाश दांडेकर, संजय गुंजाळ, दिलीप अपराध गुरुजी ,मुख्याध्यपक योगेश तंटक,राहील कडू,ऍड दत्ता पाटील,योगेंद्र गोयजी,इम्तियाज मलबारी,सचिव विजय पैर,शिक्षक सोनाली दळवी,प्रेरणा शेडगे,सुप्रिया कवळे,समीर डेरे,आयेशा पठाण रोहन घुमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
नचिकेताज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज विहूर येथील इंग्रजी माध्यम शाळेत सध्या 450 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.मुरुड शहराजवळ या शाळेची नवीन इमारत झाल्याने मुरुड शहरातील पालकाना मोठा दिलासा प्राप्त होणार आहे.याबद्दल अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version