। पनवेल । विशेष प्रतिनिधी ।
पनवेल महानगरपालिकेच्या स्वराज्य या प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन, विविध योजनांचे भूमीपूजन त्याबरोबरच इतर विकास कामांचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी ( 3 जून) सायंकाळी 5.30 वाजता आद्य क्रांतीवीर बळवंत फडके नाट्यगृहामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या समारंभास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ,पालकमंत्री अदिती तटकरे, ,खा.सुनिल तटकरे, श्रीरंग बारणे, आ. जयंत पाटील, बाळाराम पाटील, अनिकेत तटकरे, निरंजन डावखरे,..प्रशांत ठाकूर, महेंद्र दळवी, रविशेठ पाटील, भरत गोगावले, महेश बालदी, महेंद्र थोरवे, स्थायी सभापती नरेश ठाकूर, उपमहापौर सिताताई पाटील, विराधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, सभागृह नेते परेश ठाकूर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयुक्त गणेश देशमुख यांनी केले आहे. याच कार्यक्रमात अन्य विकासकामांचा प्रारंभही करण्यात येणार आहे.
पनवेल मनपा प्रशासकीय भवनाचे उद्या भूमीपूजन
