| रसायनी | प्रतिनिधी |
छावा प्रतिष्ठान, नवी मुंबई यांच्या वतीने भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात महाराष्ट्रासह भारतातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यावेळी मास्टर भूपेंद्र शिवाजी गायकवाड यांना ‘छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय क्रीडा रत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला. तसेच त्यांच्या दोन गुणवंत विद्यार्थ्यांना आदित्य अमोल खंडीझोड व धनेशा सुनील शिंगोटे यांना इंडियन नॅशनल अवॉर्ड 2026 देऊन गौरविण्यात आले. यावेळी सुभेदार कुणाल मालुसरे, आयपीएस अधिकारी दिपक साकोरे, डिसीपी डॉ. राज खतीब, अभिनेते विजय पाटकर, पैलवान चौधरी, दिपक राजे शिर्के उपस्थित होते. मास्टर भूपेंद्र गायकवाड हे स्वसंरक्षण, शारीरिक शिस्त व सामाजिक सुरक्षितता यांचा समन्वय साधणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. मास्टर भूपेंद्र्स मार्शल आर्ट स्पोर्ट्स अँड फिटनेस अकादमीचे संस्थापक म्हणून त्यांनी हजारो विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिली आहे. सन 2006 पासून सिक्युरिटी महाविद्यालयात मार्शल आर्ट ऍक्टिव्हिटी राबवून परिसरातील हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. सन 2018 पासून विभागातील मुला-मुलींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. राजमाता जिजाऊ यांच्या प्रेरणेने महाराष्ट्राचे मर्द मावळे स्पर्धेद्वारे चांदीचा कडा देऊन खेळाडूंना सन्मानित करण्याची अभिनव संकल्पना त्यांनी यशस्वीरित्या राबवली आहे.
भूपेंद्र गायकवाड पुरस्काराने सन्मानित
