सायकलची प्रगतीला साथ

न्यू इंग्लिश स्कूलसाठी बांधली बायसिकल लायब्ररी

| महाड | वार्ताहर |

आघाडीच्या जागतिक लाईफ सायन्सेस कंपन्यांकडून प्राधान्य दिली जाणारी दीर्घकालीन सहयोगी कंपनी, हायकलने महाड तालुक्यातील वलंगमधील न्यू इंग्लिश स्कूलसाठी बायसिकल लायब्ररी प्रोजेक्ट सुरु केल्याची घोषणा केली आहे. शालेय मुलांना, खासकरून आदिवासी कुटुंबातील मुलांना प्रवास करताना भेडसावणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी या प्रकल्पांतर्गत शाळेला 59 सायकल्स दान करण्यात आल्या.

न्यू इंग्लिश स्कूल या मराठी माध्यमाच्या शाळेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या वर्गांमध्ये महाडमधील 136 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यापैकी 82 विद्यार्थी गरीब आदिवासी आणि शेतकरी कुटुंबातील आहेत. बहुतांश विद्यार्थी शाळेत येण्यासाठी दररोज तीन ते चार किमी चालतात. या विद्यार्थ्यांसाठी सहज उपलब्ध होतील अशा वाहतुकीच्या कार्यक्षम सुविधा असणे गरजेचे आहे.

या विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वाहतुकीच्या समस्या दूर करण्यासाठी शाश्वत, पर्यावरणानुकूल उपाय पुरवणे हे या बायसिकल लायब्ररी प्रोजेक्टचे प्रमुख उद्दिष्ट आहे. बायसिकल लायब्ररीमध्ये 59 सायकल्स असून गावातील मुलांना दररोज शाळेत येण्याजाण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध राहतील. सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी चालना म्हणून शिक्षणाचे महत्त्व हायकल लिमिटेडने ओळखले असून, प्रत्येक विद्यार्थ्याला वाहतुकीच्या अडचणी सहन कराव्या न लागता दर्जेदार शिक्षण मिळवण्याची संधी देण्यासाठी ही कंपनी बांधील आहे. या सायकल्सची देखरेख शाळा करेल आणि त्या दीर्घकाळपर्यंत उपयोगात आणता याव्यात याची काळजी घेईल.

सायकलमध्ये आम्ही समुदाय विकास हा आमच्या कॉर्पोरेट ओळखीचा अविभाज्य भाग असल्याचे मानतो. सामाजिक कल्याणाप्रती आमची बांधिलकी विकासाच्या आड येत असलेल्या वास्तविक समस्या ओळखून त्या दूर करण्यापासून सुरु होते. धोरणात्मक सीएसआर उपक्रमांमार्फत आम्ही लोकांच्या जीवनावर शाश्वत प्रभाव निर्माण करण्यासाठी, शिक्षणाच्या आड येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी आणि समुदायांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

राजेश झा,
सायकल लिमिटेडचे एचआर

Exit mobile version