मा.आ.मनोहर भोईर यांचा (ठाकरे गट) शिवसेनेत प्रवेश
| उरण | वार्ताहर |
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी उरण विधानसभेच्या पनवेल तालुक्यामध्ये भाजपला मोठे खिंडार पाडले आहे. त्यामुळे भाजपासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जाते. शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनमुळे शिवसेनेची ताकत वाढली आहे, असे माजी आमदार भोईर म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पनवेल तालुका उपाध्यक्ष संजय मधुकर टेंबे, पंचायत समिती सदस्य तनुजा संजय टेंबे, ग्रामपंचायत आपटा सरपंच नाजनींन खालील पटेल, ग्रामपंचायत सदस्य कीर्ती कैलास कदम, सदस्य मनीषा लक्ष्मण वाघे, भाजपा बूथ अध्यक्ष सुहास बाळकृष्ण कदम, भाजपा बूथ अध्यक्ष दीपक किसन काकडे, खलील पटेल, सारसाई भाजपा बूथ अध्यक्ष कृष्णा काळ्या वाघे, रवींद्र मधुकर टेंबे, संतोष मधुकर टेंबे, कैलास बाळकृष्ण कदम, संतोष शिवराम मोकल, विलास शंकर शिर्के, समीर अब्बास नाईक, दीपक बाळकृष्ण कदम, अमित गजानन रापटे, लक्ष्मण श्रावण वाघे, अक्षय दत्तात्रय पवार, संध्या राजेंद्र पंदारे, मेघन रवींद्र टेंबे, अनघ रवींद्र टेंबे यांच्यासह अन्य कार्यकरर्ते आणि पदाधिकारी यांचा समावेश आहे.
माजी आमदार भोईर व पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील यांनी हाताला शिवबंधन बांधून व भगवी शाल देऊन सर्वांचे शिवसेनेमध्ये स्वागत केले. याप्रसंगी उपतालुका संघटक सुधीर पाटील, विभाग संपर्कप्रमुख तुकाराम गायकवाड, विभागप्रमुख दीपक देशमुख, सावळे मा. सरपंच शिवाजी माळी, सामाजिक कार्यकर्ते नंदू पाटील, गणेश भोईर, कमलाकर माळी, उपसरपंच प्रभाकर जांभुळकर, ग्रामपंचायत सदस्य वृषभ धुमाळ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.