| मुंबई | प्रतिनिधी |
भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोशल मिडीयाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. फडणवीस यांच्याबद्दल प्रक्षोभक भाषादेखील वापरण्यात आली होती. धमकी देणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात राहणाऱ्या आरोपी किंचक नवले (वय 34) याला शनिवारी (दि.02) साताऱ्यात अटक करण्यात आली आहे. किंचक नवले याचा देवेंद्र फडणवीसांना धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याचा शोध घेण्यात येत होता. आरोपी किंचक नवले हा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचा कार्यकर्ता असून अटक टाळण्यासाठी किंचक नवले हा वेशांतर करुन राहत होता. सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने मुंबईतल्या सांताक्रूझ पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेऊन वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले. त्याला वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी 7 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.