मोठी बातमी! अपात्रतेचा निकाल शिंदेंच्या बाजूने लागणार

। मुंबई । वृत्तसंस्था ।

शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निकाल हा शिंदेंच्या बाजूने आणि ठाकरेंच्या विरोधात लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचवेळी ठाकरे गट जर या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेला तर अध्यक्षांच्या निकालानंतर त्यांना आणि महायुतीच्या सरकारला कोणतीही अडचण येणार नाही याची खबरदारी घेण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या गोटातील चिंता वाढल्याचं दिसून येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातल्या जनतेला आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाची उत्सुकता लागली होती. पण आता याचा निकाल जवळपास निश्चित झाली असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांनी सुनावणीच्या वेळी केलेल्या चुका हेरून हा निकाल देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे हा निकाल ठाकरे गटाच्या विरोधात जाणार असल्याचं स्पष्ट झाल्याचं कळत आहे.

Exit mobile version