भिरा फाट्याजवळ खड्ड्यांचे साम्राज्य

सां.बा. विभागाचे र्दुलक्ष वाहनचालकांचा जीव धोक्यात

। सुतारवाडी । वार्ताहर ।

भिरा फाट्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून त्याकडेही सां.बा. खात्याने दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्याचा अंदाज रात्री एखाद्या अनोळखी वाहन चालकाला न आल्यास मोठा अपघात होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

वास्तविक महामार्गावरून रात्रंदिवस लहान मोठी वाहने ये-जा करत असतात. त्यामुळे हा महामार्ग सुस्थितीत असणे आवश्यक असताना या रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

गणपती सणापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याप्रमाणे खड्डे बुजविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले. या जीवघेण्या खड्ड्यांकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे अद्यापही वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन तेथून मार्ग काढावा लागत आहे. चारचाकी वाहनांबरोबर दुचाकी वाहनांना काही मीटर अंतर पार करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप होत आहे. असे किती वर्षे चालणार? जीवघेण्या खड्ड्यांपासून मुक्तता केव्हा मिळणार? असा प्रश्‍न लाखो वाहन चालकांना आणि प्रवाशांना पडला आहे.

Exit mobile version