डिव्हायडरला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

| पनवेल | वार्ताहार |

स्वतःच्या ताब्यातील दुचाकीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या डिव्हायडरला धडकून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल जवळील मानघर गावाच्या हद्दीत घडली. महेंद्रसिंह अकलसिंह असे मृताचे नाव आहे.

मानघर गावात जेएनपीटी ते पनवेलकडे येणाऱ्या लेनवर पुलाच्या शेवटी मोटारसायकलचा अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस घटनास्थळी गेले. यावेळी मोटारसायकल रस्त्याला लागून डिव्हायडरला धडकली होती. अपघातात महेंद्रसिंग जखमी अवस्थेत पडलेला दिसला. चौकशी केली असता चालकाने भरधाव वाहन चालवले आणि त्याचा ताबा सुटला व डिव्हायडरला धडकून अपघात झाल्याची माहिती मिळाली. महेंद्रसिंग याला कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version