कारच्या धडकेत दुचाकीचालकाचा मृत्यू

। पनवेल । वार्ताहर ।

भरधाव वेगात चाललेल्या वॅगेनार गाडीने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील बोर्ले गावाच्या हद्दीत घडली आहे. वॅगेनार (एमएच-12-एनजे-3063) गाडी घेऊन चालक भरधाव वेगाने बोर्ले टोल नाका येथून बोर्ले गावाजवळ आला असताना त्याने दुचाकी (एमएच-46-एम-5211) हीला धडक दिली. या धडकेत दुचाकीचालक सचिन पाटील (42) हे गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version