माणगाव अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्‍यू

| माणगाव | वार्ताहर |

पुणे-माणगाव रस्त्यावर दुचाकीस्वाराने विरुद्ध दिशेला जात कारला समोरून जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू होऊन दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. उमाकांत तुकाराम फाळके (34) रा. शिवाजीनगर वरवंड-पुणे, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

सदरील अपघात दि.15 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडला. सदर मोटार अपघाताचा पोलिसांनी तपास केल्यावर सोमवारी दि.18 रोजी या अपघाताबाबत गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताच्या घटनेची फिर्याद माणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार किरण तुणतुणे (39) यांनी माणगाव पोलिस ठाण्यात दिली. या अपघातात दुचाकीस्वार उमाकांत फाळके यांना गंभीर दुखापती होऊन त्यात त्यांचा मृत्यू झाला. सदर अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिस करीत आहेत.

Exit mobile version