दुचाकी चोरीचा पर्दाफाश

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

तळोजा वाहतूक पोलिसांनी नाकाबंदीच्या वेळी दुचाकी चोरीचा पर्दाफाश केला आहे. यावेळी वाहतूक पोलिसांनी मूळ मालकाचा शोध लावून दुचाकीमालक ओंकार गायकवाड यांना ताब्यात देण्यात आली. तळोजा वाहतूक पोलीस हवालदार डावकरे, पोलीस शिपाई देवकते सिग्नल येथे वाहतुकीचे नियमन करीत होते. याचवेळी पनवेलच्या दिशेने निघालेल्या दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या व्यक्तीच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी दुचाकीचालकांना थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघे गाडी जागेवरच सोडून पळून गेले. यावेळी वाहतूक पोलिसांनी मूळ मालकाचा शोध लावून दुचाकीमालक ओंकार गायकवाड यांना तळोजा येथे कारवाईसाठी देण्यात आली.

Exit mobile version