| पुणे | प्रतिनिधी |
पुण्यामध्ये भीषण अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.15) सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. पुण्यातील कात्रज चौकामध्ये हा अपघात झाला. भरधाव टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडलं. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अपघाताचा तपास कात्रज पोलीस करीत आहेत.
टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
