‘त्या’ अपघातातील जखमी दुचाकीस्वाराचा मृत्यू

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। पोलादपूर । प्रतिनिधी ।

गुरूवारी रात्रपाळी करून शुक्रवारी सकाळी मोटारसायकलवरून घराकडे परतणऱ्या तरूण कामगाराचा पार्ले स्मशानभूमीजवळ अपघात झाला होता. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रूग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र शुक्रवारी (दि.7) रात्री त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या बातमीने पोलादपूर तालुक्यात हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. शनिवारी सायंकाळी त्याच्या पार्थिवावर पोलादपूर स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अत्यल्प मोबदल्यामध्ये बेरोजगारीचे जगणे टाळणाऱ्या तरूणांना पोलादपूर ते महाड एमआयडीसीपर्यंत बससुविधा नसल्यानेच हकनाक जिवानिशी जावे लागत असल्याचा संताप व्यक्त होत आहे.

Exit mobile version