| पोलादपूर | वार्ताहर |
तालुक्यातील चोळई येथील दोन तरुण दुचाकीने महाबळेश्वर रस्त्यावरील कापडे बुद्रुक भागातून परत येत असताना झालेल्या अपघातात एकाच जागेवर मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. कापडे बुद्रुक हद्दीतील हॉटेल श्रद्धा समोरील रस्त्यावर अचानक पोलादपूर बाजूकडून एक वाहन आल्याने दुचाकीवरील राज विनोद कदम (17) याने दुचाकीवरून उडी मारली. यामुळे दुचाकीस्वार आदित्य सतीश पवार याचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकी रस्त्याच्या साईडपट्टीच्या दिशेने गेली. या अपघातात राज विनोद कदम याचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकीस्वार आदित्य पवार हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला पोलादपूर ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल केले. याप्रकरणी पोलीस हवालदार नितेश कोंढाळकर हे साहेब पोलीस निरीक्षक आनंद गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.