| पोलादपूर | प्रतिनिधी |
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील लोहार माळ येथे शिवराजबीआय शॉपीच्या समोर आयशर टेम्पोची स्कूटरला धडक बसून झालेल्या अपघातात गंभीररित्या जखमी झालेल्या दहा वर्षीय रिया सुनील पवार हिचे एमजीएम कामोठे रुग्णालयात उपचारादरम्यान शुक्रवारी पहाटे निधन झाले. बुधवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला होता. दरम्यान, गंभीर जखमी अवस्थेत रिया हिला एमजीएम कामोठे रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि तिचा जीव वाचण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, पहाटेच्या सुमारास ती उपचारादरम्यान मयत झाल्याची माहिती पोलादपूरला येऊन धडकली आणि पोलादपूर पुन्हा एकदा शोकसागरात बुडाले.