| पनवेल | वार्ताहर |
एफझेड मोटार सायकलीस करंजाडे खाडी पुलावरुन सर्व्हीस रस्त्याकडे येणार्या वॅगेनार गाडीची धडक बसून झालेल्या अपघातात मोटार सायकलस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. राजेश शेलार (30) हा त्याच्या ताब्यातील एफझेड मोटार सायकल घेवून करंजाडे खाडी पुलावरुन सर्व्हीस रस्त्याकडे जात असताना उतरणीला चिंचपाडा ब्रीजकडून येणार्या वॅगेनार गाडी वरील चालकाने त्यांच्या मोटार सायकलीस धडक दिल्याने झालेल्या अपघातात राजेश शेलार हे जखमी झाले आहेत. या घटनेनंतर वॅगेनार गाडी चालक गाडीसह पसार झाल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.







