महिलेचे गंथन खेचून बाईकस्वार पसार

| तळा | वार्ताहर |

तळा बाजारपेठेत काळ्या रंगाच्या मोटारसायकल वर आलेल्या दोन अज्ञात ईसमांनी महिलेचे गंथन खेचून तेथून पसार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की तळा बाजारपेठेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून वैशाली विठोबा वाघमारे राहणार हनुमान नगर या आपल्या लहान मुलीसोबत चालत तळा बाजारपेठेत जात असताना समोरून काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या व्यक्तीने सदर महिलेच्या गळ्यातून सोन्याचे गंथन जबरदस्तीने खेचून इंदापूर बाजूकडे मोटारसायकल घेऊन पळून गेले. एक दिवस आधीच शहरातील आफताब जनरल स्टोअर्स या दुकानात चोरी होऊन रोख रक्कमसह 52 हजार रुपयांचा माल चोरीला गेला होता. त्यापाठोपाठ दुसर्‍याच दिवशी भर बाजारपेठेत महिलेच्या गळ्यातील गंथन चोरीला गेल्याने शहरातील नागरिकांसह महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात चोरीच्या घटनेत वाढ होत असल्याने चोरांना पकडणे तळा पोलिसांसमोर एक मोठे आव्हान असणार आहे. सदर आरोपींविरुद्ध तळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पीएसआय शिवराज खराडे हे करीत आहेत.

Exit mobile version