बिल्किश बानो प्रकरणाचा अलिबागमध्ये निषेध

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
बिल्किश बानो यांच्यावर अत्याचार करणार्‍यांना गुजरात सरकारने मुक्त केले. काही संघटनांनी या आरोपींचा सत्कार केला. याचा अलिबागमधील संविधानप्रेमी समविचारी मंडळातर्फे निषेध करण्यात आला. अलिबाग एसटी स्टँड येथे आंदोलन करण्यात आले.

नितिनकुमार राऊत, योगेश मगर, दिलीप जोग, अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, नागेश कुलकर्णी, अनिल गायकवाड, बी.जी. पाटील, किशोर पाटील, सुरेखा पाटील, सुप्रिया जेधे, अ‍ॅड. प्रवीण ठाकूर, अशरफ घट्टे, निर्मला फुलगावकर, शुभांगी जोगळेकर, शाम जोगळेकर, अरुण गोंधळी, अनंत गोंधळी, अ‍ॅड. प्रथमेश पाटील, प्रज्ज्वल पडोळे, भूषण मगर, प्रल्हाद घेवदे, सुजय घरत, आशा वारंगे, अल्ताफ लोगडे, बाबू सय्यद आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Exit mobile version