‌‘जलजीवन’ची बिले रखडली

कामांचा वेग मंदावला; ठेकेदार आर्थिक अडचणीत

| खोपोली | प्रतिनिधी |

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून खालापूर तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत 92 पाणीपुरवठा योजनांची कामे मंजूर असून, त्यापैकी 34 पाणी योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. तर, उरलेल्या 58 योजनांची कामे वर्षअखेर पूर्ण करण्यासाठी ठेकेदार प्रयत्न करीत आहेत. केलेल्या खर्चाच्या प्रमाणात देयके मिळत नसल्याने ठेकेदार प्रचंड आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे कामांचा वेग मंदावला आहे. तर, रखडलेल्या पाणी योजनांचे काम पूर्ण करून घेण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यांची धावपळ सुरू आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत ‌‘हर घर जल’ ही योजना सध्या ग्रामीण भागात राबवण्यात येत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील घराघरापर्यंत पाणी पोहचवण्यात यावे, हा सरकारचा हेतू आहे. खालापूर तालुक्यातील 92 पाणीपुरवठा योजना पूर्ण करण्यासाठी ठेकेदार आणि कंत्राटदारांनी काम सुरू केले आहे. यामधील तोंडली, शेणगाव, चिलठण, रानसई, तांबाटी, खरवई, जाबरुंग, आंबिवली, होनाड, उंबरविरा, नडोदे, दुरशेत, हाळखुर्द, होराळे, मोरबे, डोलवली व माणकिवली, बोरगाव खुर्द, उजलोळी, वणी, वारद, गोहे, अजिवली, पाली बुद्रुक, कलोते मोकाशी, वनवटे, अंजरूण, वयाळ, कलोते रयती, स्वाली, कांढरोली तर्फे वनखळ, तुकसई, चिंचवली गोहे, आसरे, केळवली या 34 गावांच्या पाणी योजना पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत 58 योजनांचे काम प्रगतीपथावर आहे. केलेल्या खर्चाच्या प्रमाणात देयके मिळत नसल्याने ठेकेदार प्रचंड आर्थिक संकटात आहेत. पावसाळ्यानंतर पाणीयोजना पूर्ण करून घेण्यासाठी खालापूर ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग उपअभियंता संतोष चव्हाण सातत्याने ठेकदारांकडे पाठपुरावा करीत आहेत. परंतु, केलेल्या खर्चाच्या प्रमाणात देयके मिळत नसल्याने कामांचा वेग मंदावला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर रखडलेली बीले मिळत नसल्यामुळे दिवाळी साजरी कशी करायची अन्‌‍‍ उर्वरीत विकासकामे कशी पूर्ण करायची? असा प्रश्न ठेकेदारांना पडला आहे.

निधीअभावी रखडेल्या 58 पाणी योजना
आसरोटी, चांभार्ली, गोठीवली, इसांबे, खरीवली, माडप, नारंगी, निगडोली, परखंदे, वावोशी, नावढे, सारंग, विणेगाव, तळाशी, आंबेवाडी (वरोसे तर्फे वनखळ), कोपरी आंबेमाळवाडी, कुंभिवली, घोडीवली व कांढरोली, चावणी, आडोशी, बीड खुर्द, भिलवले, ढेकू, डोणवत, गोरठन खुर्द, हातनोली, जांभिवली तर्फे छत्तीशी, करंबेळी, खानाव, माजगाव, मांदाड आत्करगाव, नंदनपाडा, पराडे, पौद, साजगाव, सावरोली निफान, सावरोली, शिरवली, टेभरी, ठानेन्हावे व सांगडे, तुपगाव, उंबरे, उसरोली, वड्विहीर, वटखांबे, वांगणी कारगाव, सोंडेवाडी, वावंढळ, सारसन, धामणी, खांबेवाडी, वडवळ, वावरले, खरसुंडी, गोरठन बु,आपटी, चिंचमाळ.
Exit mobile version