• Login
Thursday, July 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सरकारचं ‌‘जलजीवन मिशन’ फेल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
December 4, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
सरकारचं ‌‘जलजीवन मिशन’ फेल
0
SHARES
63
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आजही अनेक गावे तहानलेलीच; निम्म्याहून अधिक योजनांची कामे अपुरीच

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

जलजीवन मिशन योजनेची कामे मार्च 2024 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित असताना मुदत संपून वर्ष लोटल्यानंतरही केवळ 59 टक्के योजना पूर्ण झाल्या आहेत. यामुळे जलजीवनच्या यशस्वीतेबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशन योजना रायगड जिल्ह्यात राबविण्यात आली. गावे, वाड्यांमधील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी करोडो रुपये खर्च करून 1 हजार 592 योजना सुरू करण्यात आल्या. मार्च 2024 पर्यंत योजनांचे काम पूर्ण होणे अपेक्षित असताना, निम्म्याहून अधिक योजना अपुऱ्या असल्याचे समोर आले आहे. निधीअभावी जलजीवनची योजना रखडली आहे. गावे, वाड्यांमध्ये टाकी, पाईप, नळ असतानाही जिल्हा तहानलेला, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अपूर्ण योजनेमुळे टँकर लागत असतील, तर त्याचे पैसे भरण्याचा भार ठेकेदारावर सोपविण्यात आला आहे. अशा नोटीसा बजावल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात जलजीवन बोजवारा उडाल्याचे उघड झाले आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडील अपुरे मनुष्यबळ, पाणीपुरवठा योजनांचे चुकीचे सर्वेक्षण, चुकीच्या प्रशासकीय मान्यता, एकेका ठेकेदाराने घेतलेली अनेक कामे, अनेकांना काम करण्याचा अनुभव नसणे, ग्रामपंचायत स्तरावर ठेकेदारांना मिळत असलेले असहकार्य आणि झालेल्या कामाचे पैसे मिळण्यात असलेल्या अडचणी या सर्वांचा एकत्रित परिणाम होऊन जलजीवन मिशनच्या पाणीपुरवठा योजनांची कामे रखडली असून, अनेक योजनांचा बोजवारा उडाला आहे, तर काही योजना अद्यापही कागदावरच आहेत.

रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या 16 लाख 64 हजार इतकी आहेे. जिल्ह्यात एक हजार 800 हून अधिक गावे, वाड्या आहेत. 809 ग्रामपंचायती असलेल्या या ग्रामीण भागात जानेवारी महिन्यानंतर पाणीटंचाईला सुरुवात होते. दरवर्षी पाण्याचा प्रश्न कायमच नागरिकांना भेडसावत आहे. टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर येते. पाण्याचा प्रश्न कायमचा सोडविण्यासाठी केंद्र शासनाने जलजीवन ही महत्त्वाकांक्षी योजना तीन वर्षांपूर्वी सुरू केली. गावांतील पाण्याचा स्त्रोत शोधून त्याद्वारे पाणीपुरवठा घराघरात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आली. रायगड जिल्ह्यात एक हजार 592 योजना राबविण्यात आल्या अनेक ठेकेदारांना कामे देण्यात आले. मार्च 2024 पर्यंत काम करण्याची मुदत होती. परंतु, काही गावांत योजना राबविली. परंतु, पाणी घरात पोहोचले नाही. काही गावांमध्ये पाईपलाईन टाकण्यात आली. प्रत्यक्षात मात्र कामाला गती दिसली नाही. करोडो रुपये या योजनांवर करण्यात आले. परंतु, मुदतीमध्ये ही योजना पूर्ण झाली नाही. शासनाकडून निधी मिळणे थांबल्याने योजनेचे कामही संथ गतीने सुरू झाले आहे. काही ठिकाणी कामेच अपुरे असल्याची माहिती समोर आली आहे.

‌‘हर घर जल’ या घोषणेसह पाण्याच्या हजारो योजना मंजूर करण्यात आल्या. परंतु, जिल्ह्यातील 60 टक्के योजना आजही अपूर्णावस्थेत आहेत. निधीअभावी कामे रखडल्याने गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. मात्र, या टँकरचा खर्च संबंधित ठेकेदारांकडून वसूल केला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

योजनांचा अभाव, चुकीचे नियोजन, अस्तित्वात नसलेल्या जलस्त्रोतांवर योजना मंजूर करणे, जुन्याच योजनांची रंगरंगोटी करून बिले काढणे, जुने पाईप टाकणे, असे अनेक प्रकार उघडकीस आणून देण्यात आले. मात्र, त्याबाबत योग्य कार्यवाही झाली नाही. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून योग्य व्यवस्थापन नसल्याचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसत आहे. पाण्याविना गावे, वाड्या असल्याचे चित्र आहे. करोडो रुपयांची बिले थकीत असून, शासनाकडून निधी आला नाही. त्यामुळे अनेक योजनांची कामे रखडली आहेत.

कंत्राटदार अडकले
कंत्राटदारांची सुमारे 95 कोटींची बिले थकली आहेत. मात्र, शासनाकडून केवळ 20 कोटी प्राप्त झाले आहेत. ज्यांचे राजकीय वजन आहे, त्यांची बिले निघाली, बाकीचे मात्र अडकले असल्याची माहिती सावंत यांनी दिली.
चार तालुक्यांना लाल शेरा
रायगड जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये उरण, खालापूर, महाड व अलिबागमध्ये जलजीवन मिशन योजनेचीच्या कामांचा खेळखंडोबा झाला आहे. या तालुक्यात कामांची प्रगती चांगली नसल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे. जलजीवनच्या कामाबाबत या तालुक्यांना लाल शेरा देण्यात आला आहे. पेण, कर्जत, पनवेल, पोलादपूर, मूरूड तालुक्याला यलो सिग्नल दाखविण्यात आला आहे. या तालुक्यातील कामे बऱ्यापैकी पूर्ण झाली आहेत. तसेच माणगाव, सुधागड रोहा, म्हसळा, श्रीवर्धन व तळा या दक्षिण रायगडमधील तालुक्यांमध्ये योजनेची कामे चांगल्या पद्धतीने झाल्याची माहिती ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहेत.

शिल्लक असलेल्या योजनांवर दृष्टीक्षेप

तालुके एकूण योजना शिल्लक योजना
उरण 2216
खालापूर9258
महाड 171106
अलिबाग14476
पनवेल13666
कर्जत14366
पेण12047
पोलादपूर 9838
मूरूड 6523
माणगांव 16148
सुधागड 9727
रोहा 15180
म्हसळा6225
श्रीवर्धन 7014
तळा6011
एकूण 1592652


जलजीवन योजनेची कामे मार्च 2024 पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. परंतु, ती कामे वेळेवर करण्यात आली नाही. ज्या ठेकेदारांनी कामे योग्य पद्धतीने केली नाहीत, त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. अनेकांकडून दंड आकारण्यात आला आहे. ज्या ठेकेदारांचे काम योग्य आहे, त्या ठेकेदारांचे काम अपूर्ण राहिले आहे. त्यांच्या कामांना पुन्हा निविदा काढण्याची सूचना केली आहे. आतापर्यंत 34 हून अधिक कामे रिटेंडर आहेत. योजनांची कामे वेळेत पूर्ण न केल्याने गावांमध्ये पाणीसमस्या निर्माण झाली आहे. त्याबाबत टँकरची सुविधा ठेकेदारांनी करण्याची सूचना दिले आहे.

-मोहन सरवदे,
कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा
रायगड जिल्हा परिषद

जलजीवन योजना सुरु झाल्यापासून नियोजनाचा अभाव, भ्रष्टाचाराबाबत सातत्याने पत्रव्यवहार करण्यात आले आहे. अस्तित्वात नसलेल्या जलस्त्रोतांवर योजना मंजूर करणे, जुन्याच योजनांची रंगरंगोटी करून बिले उकळण्याचे प्रकार उघडकीस आणले आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करून प्रशासनाला कंत्राटदारांकडून टँकरचे पैसे मागण्याची वेळ येत असेल, तर हा प्रकार हास्यास्पद आहे. या योजनेचे पूर्ण अपयश आहे.

-संजय सावंत,
सामाजिक कार्यक
र्ते

Related

Tags: indiajal jeevan missionJaljeevan Mission Schemekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newswater issues
Previous Post

रेल्वे स्थानकाच्या नामांतरासाठी निवेदन

Next Post

आंबा घाटात खाजगी बस दरीत कोसळली

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

म्हसळा नगरपंचायतीचा भोंगळ कारभार; शाळेसमोर गटारात पडण्यापासून विद्यार्थ्याचा थोडक्यात बचाव

July 16, 2026
Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ
sliderhome

Crop Insurance Scheme: पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ

July 16, 2026
sliderhome

महाड-दापोली मार्गावर एसटी बस घसरली

July 16, 2026
उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड
पनवेल

उद्यानातील सुरक्षा रक्षकांची परवड

July 16, 2026
जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी
कर्जत

जनतेच्या पैशाची वारेमाप उधळपट्टी

July 16, 2026
sliderhome

खंडाळे ग्रामपंचायतीतील जमीन गैरव्यवहार उघड

July 16, 2026
Next Post
आंबा घाटात खाजगी बस दरीत कोसळली

आंबा घाटात खाजगी बस दरीत कोसळली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?