फणसाड अभयारण्यात पक्षीगणना

166 पक्ष्यांच्या प्रजातीची नोंद

। मुरुड जंजिरा । सुधीर नाझरे ।

मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात नुकताच ग्रीन वर्क्स ट्रस्ट आणि एस. बी. आय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच महाराष्ट्र वन विभाग, ठाणे (वन्यजीव) विभाग यांच्या सहकार्याने फणसाड वन्यजीव अभयारण्य येथे आयोजित करण्यात आलेल्या पक्षी गणनेचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. हा कार्यक्रम 25 ते 27ऑक्टोबर 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आला होता. गणनेत एकूण 5 राज्यांमधून 35 पक्षी निरीक्षक त्याचप्रमाणे ग्रीन वर्क्स ट्रस्टचे 15 स्वयंसेवक आणि 15वन कर्मचारी यांनी सहभाग घेतला. ठाणे वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, फणसाड वन्यजीव अभयरण्याचे सहाय्यक वनसंरक्षक मनोहर दिवेकर तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी नारायण राठोड यांचे मोलाचे मार्गदर्शन या कार्यक्रमाला लाभले.

वैज्ञानिक पद्धतीने राबविल्या गेलेल्या या गणनेत एकूण 166 पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद करण्यात आली. पक्षी गणनेबरोबरच अभयारण्यातील इतर जैवविविधतेची नोंद सहभागी लोकांनी केली. त्यात एकूण 51प्रजातींची फुलपाखरे, 18उभयचर प्राणी, 9सर्प प्रजाती तसेच16 सस्तन प्राण्यांची नोंद झाली आहे. अभयरण्याच्या विविध भागत तसेचफणसाडसारख्या जैवविविधता पुर्ण जंगलात सहभागी लोकांनी जंगलाच्या विविध भागात जाऊन आपली निरीक्षणे नोंदवली. गणने आधी सहभागी लोकांसाठी कार्यशाळा घेण्यात आली तसेच अभयरण्याच्या पर्यटन संकुलात त्याचा सराव देखित घेतलला गेला. अशा प्रकारचे उपक्रम अभयारण्यात वर्षभर राबवविले जाणार असून पुढील पक्षीगणना जानेवारी महिन्यात करण्यात येईल, अशी माहिती ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्‍वस्त डॉ. निखिल भोपळे यांनी दिली.

Exit mobile version