| बदलापूर | प्रतिनिधी |
बदलापूर येथील शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांना भाजपनं स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली होती. यानंतर भाजपवर चहूबाजूंनी टीका झाली. दोन वर्षांपूर्वी राज्याला हादरवणाऱ्या बदलापूर शहरातील दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता. आपटे त्या प्रकरणातील सहआरोपी आहेत. जामिनावर सुटका झालेल्या आपटेला स्वीकृत नगरसेवक पदी संधी दिल्यानं भाजपवर टीका झाली. यानंतर आपटे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे. कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत शुक्रवारी झालेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीत भाजपच्या दोन, शिवसेनेच्या दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याची निवड करण्यात आली. शुक्रवारी नवीन प्रशासकीय इमारतीमधील सभागृहात पार पडलेल्या पहिल्या सभेत एकूण पाच स्वीकृत नगरसेवकांची निवड जाहीर झाली. भाजपनं बदलापूर येथील शैक्षणिक संस्थेचे सचिव तुषार आपटे यांनी कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. याबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून संताप व्यक्त झाला. विरोधकांनी भाजपला लक्ष्य केलं.
भाजपवर मोठी नामुष्की

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606