। खोपोली । वार्ताहर ।
खालापूर नगरपंचायतीच्या स्वीकृत नगराध्यक्षा पदावर शेतकरी कामगार पक्षाकडून माजी नगराध्यक्षा शिवानी संतोष जंगम तर सेनेकडून सुप्रिया सुनिल साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बुधवारी नगरपंचायत खालापर स्वीकृत नगरसेवकपदाची निवडणूक जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने घेण्यात आली. सतरा नगरसेवक असलेला नगरपंचायती शिवसेनेचे आठ शेतकरी कामगार पक्षाचे सात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन नगरसेवक असे संख्याबळ आहे. दोन स्वीकृत नगरसेवक पदासाठी शेकापकडून शिवानी जंगम आणि शिवसेनेच्या सुप्रिया साळुंखे ह्याने अर्ज भरला.दोघींची निवड बिनविरोध झाली आहे. शेकापकडून शिवानी जंगम यांचे नाव ठरले होते तर शिवसेनेत आठ ते दहाजण इच्छुक होते.परंतु सुप्रिया साळुंखे यांनी बाजी मारली. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकाच्या शर्यतीत असलेले माजी सभापती आणि माजी स्वीकृत नगरसेवक उमेश गावंड आणि राष्ट्रवादीचे वैभव भोईर यांच्या नवांना पूर्णविराम मिळाला आहे.