उरणमध्ये भाजपला धक्का

कार्यकर्त्यांचा शेकापमध्ये प्रवेश

। पनवेल । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन भाजप आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे प्रीतम म्हात्रे आणि पक्षातील पदाधिकार्‍यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नारायण शेठ घरत, जितेंद्र म्हात्रे, गुरुनाथ गायकर, राम भोईर, जगदीश पवार, रामेश्‍वर आंग्रे, अनिल घरत यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

शेकापचे प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून अनेकजण भाजप आणि इतर पक्षातून शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत. शेकापमध्ये पक्ष प्रवेशाचा ओघ वाढत चालला आहे. सोनारी गावातील शेकापमध्ये प्रवेश केलेल्या काही जणांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मात्र या तरुणांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, ज्यांना नोकरीवरून काढले आहे, त्यांना नोकरीला लावण्याचे काम मी करणार असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. घारापुरी येथील निकेतन घरत आणि रोहन पाटील या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. प्रदीप तुंगारे, गणेश भोईर, विकास मोरे यांनीदेखील शेकापमध्ये जाहीर प्रवेश केला. आमच्यावर विश्‍वास ठेवून तुम्ही पक्षात प्रवेश केला आहे, त्या विश्‍वासाला तडा जाऊन देणार नसल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले.

Exit mobile version