पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत रविवारी खांदा कॉलनी येथील श्री रोहन व्हटकर मित्र परिवार युवा कार्यकर्त्यांनी शेकापमध्ये प्रवेश केला. यावेळी रोहन व्हटकर, संतोष कदम, युवराज भोसले, संतोष भोसले, नंदू पवार, लाल मणी, प्रफुल जाधव, यशवंत गावकर , राजन गावकर, राजू तिवारी ,अभिषेक कांबळे ,शुभम नार्वेकर ,शंकर गोवारी ,राहुल नार्वेकर, अशोक हजारे , शैलेश कळसकर, विशाल व्हटकर , सिद्धार्थ लोंढे, अनिल दगडे आणि इतर तरुणांनी प्रवेश केला.प्रीतम म्हात्रे यांनी सर्वांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक शंकरशेठ म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील , शेकाप प.म.पा.जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे, मा.नगरसेवक,शवाजी थोरवे,मा.नगरसेवक डी. पी. म्हात्रे, कामगार नेते प्रकाश म्हात्रे, शेकाप सहचिटणीस नंदकुमार भोईर, खांदा कॉलनी शेकाप अध्यक्ष अनिल बंडगर, शेकाप नेते हरिश्चंद्र मढवी,युवानेते श्री. मंगेश अपराज हे उपस्थित होते.
शेकाप तरुणांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत आला. यापुढेही नव्याने पक्षात येणार्या तरुणांसाठी पक्षाच्या मार्फत रोजगार, स्वयंरोजगार साठी योग्य ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल. प्रवेश केलेल्या तरुणांमुळे खांदा कॉलनी शेतकरी कामगार पक्षाला एक नवीन तरुणांची फळी मिळाली याचे समाधान आहे.
प्रीतम म्हात्रे,विरोधी पक्षनेते
याप्रसंगी प्रवेशकर्ते श्री रोहन व्हटकर यांनी सांगितले की प्रितमदादांनी आजपर्यंतचे शे.का.पक्ष आणि त्यांच्या जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्था या संस्थेमार्फत जे उपक्रम राबवले त्यांचे सुरू असलेले काम पाहून आम्ही सर्व तरुणांनी एकत्रितपणे दादांच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश करून पनवेलच्या विकासासाठी त्यांचे हात बळकट करण्याचे ठरवले आणि आम्ही एक मुखाने पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला. पूरग्रस्तांसाठी गेले दोन दिवस दादांच्या माध्यमातून जे मदत कार्यसुरू आहे त्यामध्ये एक आमचा सुद्धा छोटासा वाटा म्हणून आमच्या मंडळातर्फे पाण्याचे बॉटल पूरग्रस्तांसाठी देत आहोत.