दलितांना आकर्षित करण्यासाठी भाजपचा नारा

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वच पक्षांनी आता आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केलीय. या निवडणुकीत महिंदुत्वा सोबतच मागासवर्गीयांचा ही मुद्दा भाजपनं उचलून धरलाय. दलितांच्या 10 वेळा घरी जा.. तिथं चहा प्या, जेवण करा आणि मगच मत मागाफअसं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे.
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच भाजप नेत्यांची एक मोठी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पक्षातील नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना काही टीप्सही देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, निवडणुकीच्या पाश्‍वर्र्भूमीवर मागासवर्गीय जाती-जमातीतील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपकडून वेगवेगळ्या युक्त्या आखण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांनी कार्यकर्त्यांना सल्ला दिलाय, की दलित बांधवांकडे अधिकाधिक जावे. त्यांच्यासोबत चहा घ्यावा, जेवण करावे, संपर्क वाढवावा आणि मगच मते मागावीत. यावेळी ओबीसी आणि उच्चवर्णीय समाजातील पक्ष कार्यकर्त्यांशी स्वतंत्र देव सिंह यांनी संवाद साधला. रविवारी आयोजित करण्यात आलेल्या मओबीसी सामाजिक प्रतिनिधी संमेलनफ आणि मवैश्य व्यापारी संमेलनाफत ते बोलत होते.

Exit mobile version