| मुंबई | प्रतिनिधी |
बीकेसीच्या एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्यास शिंदे गटाचा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. तर बीकेसीतील दुसर्या मैदानात शिवसेनेकडून दाखल करण्यात आलेला अर्ज फेटाळला गेला आहे.
दरवर्षीप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क म्हणजेच शिवतिर्थावर होणार की नाही यावर अजुनही प्रश्नचिन्हच आहे. शिवाजी पार्क वरच आम्ही दसरा मेळावा घेणार असे दावे दोन्ही गटांकडून केले जात आहेत. मात्र मुंबई पालिकेनं कोणाच्याच अर्जाला अद्याप मंजूरी दिली नाही. त्यामुळे दोन्ही गटांकडून पर्यायी व्ययवस्थेची शोधाशोध सुरु झाली. यात बीकेसीच्या एका मैदानाकरता ठाकरे गटानं तर दुस-या मैदानाकरता शिंदे गटानं एमएमआरडीएकडे दसरा मेळाव्यासाठी अर्ज दाखल केले होते. यात एमएमआरडीए प्ररासनानं ठाकरे गटाचा अर्ज नापास ठरवत एकनाथ शिंदे गटाच्या अर्जाला मात्र पास केलं आहे.