हिंदू जनजागरण समितीचा आरोप
मुंबई | प्रतिनिधी |
कोरोना काळापासून मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिरात ‘दर्शन प्रवेशिकां’मध्ये काळाबाजार होत असल्याचा आरोप हिंदू जनजागरण समितीने केला आहे.
सिद्धी विनायक मंदिरातङ्घऑनलाईन अॅपफवर बुकींग करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे भक्तांना थेट दर्शन मिळत नाही. भक्त बुकींगसाठी ऑनलाईन अॅपवर गेल्यावर आधीच दर्शनाच्या सर्व प्रवेशिका मंदिर परिसरातील सर्व दुकानदारांनी अनेक बनावट खाती काढून बुक केलेल्या असतात. त्यामुळे भक्तांना प्रवेशिका मिळत नाहीत. स्थानिक दुकानदार ङ्गआम्ही तुम्हाला दर्शनासाठी प्रवेशिका देतोफ असे सांगून सिनेमातील तिकिटांप्रमाणे काळाबाजार करून प्रत्येक भक्तांकडून 200 ते 300 रुपयांची लूट करत आहेत. केवळ दुकानदारच नाही, तर विश्वस्त मंडळातील काही जणही सहभागी असून दोन व्यक्तींसाठी 1,500 रुपयांची मागणी करत आहेत. पोलिसांनी धाडी टाकून आता काही जणांवर कारवाई केली असली, तरी ती किरकोळ असून सर्व दोषींवर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. यासाठी ज्यांच्याकडून असे पैसे घेतले गेले आहेत, त्या सर्व भक्तांनी तक्रारी करण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन हा घोटाळा उघडकीस आणणारे मुंबईतील डॉ. अमित थडानी यांनी केले. ते हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ङ्गमंदिरांचे सरकारीकरण : सरकारी लुटीचे तंत्रफ या विषयावर आयोजित ङ्गऑनलाईनफ विशेष संवादात बोलत होते.







