| पनवेल | प्रतिनिधी |
खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी सायंकाळी पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन राबविण्यात आले. सर्वत्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांतर्फे कोंबिंग ऑपरेशन, नाकाबंदी राबविण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर खांदेश्वर पोलिसांतर्फे पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोंबिंग ऑपरेशनदरम्यान नागरिकांची तपासणी करण्यात आली. आदई सर्कल आणि एअरटेल गॅलरीजवळ नाकाबंदी करून संशयित वाहनांची तपासणी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्यासह पोलीस अधिकारी, अंमलदार या कोंबिंग ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते.