डाक अधीक्षकांच्या प्रेरणेमुळे कर्मचार्‍यांचे रक्तदान

| सारळ | वार्ताहर |

रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून, सैनिकाप्रमाणे आपणास प्रत्यक्ष देशसेवा करता येत नसली तरी रक्तदानातून आपल्या देशवासियांची आपण उत्तम सेवा करू शकतो, अशी महती डाक अधीक्षक सुनील थळकर यांनी कर्मचारीवर्गास सांगत जागतिक रक्तदान दिनानिमित रक्तदान करण्याचे आवाहन केले. अधीक्षकांच्या प्रेरणेमुळे 13 डाक कर्मचार्‍यांनी स्वेच्छेने जिल्हा रुग्णालयामधील रक्तपेढीत जाऊन रक्तदान केले. यात महिला व मुलींचाही सहभाग होता. या अभियानात सरिता म्हात्रे, निशा रांनी, एकता श्रीवास्तव, तमन्न यादव, मनोज अंबुरे, नागेश शैला साखरकर, मयूर जेन, मनीष दगुर, राजीव रंजन, राजीव पॉल, गजेंद्र सिंह, सुभाष कुमार यांनी रक्ततदान केले. या सर्वांचा गौरव डाक अधीक्षकांनी केला.

Exit mobile version