40 दांपत्यांचा सहभाग
| गोवे-कोलाड | वार्ताहर |
नवरात्रौत्सव दरम्यान गुजराती समाज कोलाड आंबेवाडी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन गुजराती समाज सामजिक सभागृह कोलाड आंबेवाडीत केले होते. त्यात 40 दांपत्यांनी रक्तदान करून भरभरून प्रतिसाद दिला.
यावेळी यश गांधी, शुभम गांधी, डॉ. विनोद गांधी, जितेंद्र मेहता, भाऊ गांधी, अभिजित गांधी, बिपीन गांधी, रुपेश गांधी, मयूर गांधी, प्रवीण गांधी, प्रशांत मेहता, संदीप गांधी, विवेक गांधी, लुकेश मेहता, अमिता गांधी, सपना गांधी, रुचिता मेहता, हेमांगी गांधीसह कोलाड आंबेवाडी येथील सर्व गुजराथी समाज पदाधिकारी तसेच रक्तदाते बहुसंख्येने उपस्थित होते. या शिबिरात अलिबाग रक्तपेढीतील डॉ. गोसावी आणि त्यांचे सहकाऱ्यांना रक्तसंकलनाचे काम केले. शिबीर यशस्वी करण्यासाठी कोलाड आंबेवाडी गुजराती समाजाच्या वतीने सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.