स्वप्नपूर्ती संकुलात रक्तदान शिबीर

| पनवेल । प्रतिनिधी ।
स्वप्नपूर्ती संस्कृतिक उत्सव मंडळ खारघर सेक्टर 36 मध्ये सलग पाच वर्ष नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते. रक्तदान शिबिरात तब्बल 71 बाटल्यां रक्त संकलन करण्यात आले. संगीत भजन, महिलांसाठी संगीत खुर्ची, लहान मुलाच्या कालांना वाव देण्यासाठी चित्रकला स्पर्धा, आजची स्त्री शक्ती याबद्दल शिवप्रेमी वैधेही मोरे यांचे व्याख्यान, मंगळागौर, वेशभूषा, होम हवन, अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यासाठी मंडळाचे संस्थापक शरद बिबवे, अध्यक्ष सचिन बार्वे, उपाध्यक्ष मनोज मोहोड, सचिव संदीप खोचरे, खजिनदार नागेश सावंत आदी पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली. या नवरात्रोत्सवात सभासद व स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात भाग घेतल्याने उत्साहाच वातावरण पाहायला मिळाले.

Exit mobile version