। अलिबाग । वार्ताहर ।
अलिबाग रविवार 26 जून रोजी जिल्हा बुरूड समाज अलिबाग शाखेतर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालय अलिबाग येथे करण्यात आले आहे. तसेच या दिवशी जिल्हा बुरूड समाजाचा वार्षिक मेळावा व विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार व महिला हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, विनोद सुर्वे, प्रदिप नाईक, अश्विनी पाटील,संजना किर तसेच जिल्हा बुरुड समाज जिल्हाध्यक्ष रुपेश जामकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन अलिबाग बुरूड समाजाचे अध्यक्ष संजय मोरे यांनी केले आहे.