तळा येथे रक्तदान शिबीर संपन्न

। तळा । वार्ताहर ।
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या 672 व्या संजीवन समाधी सोहळ्या निमित्त द.ग.तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा व श्री नामदेव महाराज युवक मंडळ तळा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार 24 जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरा करिता शासकीय रक्तपेढी अलिबाग येथील डॉक्टर गोसावी व त्यांची टीम उपस्थिती होती. या वेळी डॉक्टर गोसावी यांनी रक्तदान का व कशासाठी करावे या बाबत थोडक्यात मार्गदर्शन केले. या रक्तदान शिबिरास तळा परिसरातून उत्तम प्रतिसाद लाभला.या रक्तदान शिबिरास माणगाव उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रवीण पाटील यांनीही सदिच्छा भेट दिली. पोलीस कर्मचारी वर्गाने या शिबिरात रक्तदान करून आपला सक्रीय सहभाग नोंदवला. या रक्तदान शिबिरास तळा परिसरातून 67 रक्तदात्यांनी रक्तदान केले.

Exit mobile version