जिते गावात रक्तदान शिबीर

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळजवळील जिते गावातील शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवली येथील प्लाझ्मा ब्लड बँकेकडून रक्तसंकलन करण्यात आले. रक्तदान शिबिराला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला होता. गावातील तरुणांनी स्थापन केलेल्या शिवस्वराज्य बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष अक्षय सुभाष जाधव, विकास शेळके, निलेश घरत, वांगडाना हजारे, चिंतामणी भोईर, योगेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. तर रक्तदान शिबिरासाठी आरोग्य स्नेही उत्तम पालांडे, रवी निमसे, रंजना धुळे यांचे विशेष सहकार्य राहिले.

Exit mobile version