अ‍ॅड. मनोज धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर


माजी आ. पंडित पाटील ,अ‍ॅड. आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील यांची उपस्थिती
। श्रीगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील पेझारी येथील जि.प.चे माजी अध्यक्ष प्रकाश धुमाळ यांचे पुत्र व पेझारी ग्रामपंचायत उपसरपंच अ‍ॅड. मनोज धुमाळ यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 27 ऑक्टोबर रोजी रक्तदान व आरोग्य शिबिराचे श्रीगणेश क्रीडा मंडळ दिवलांग, उडाण सामाजिक संस्था व आई जेनिरिक मेडिकल स्टोअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. सदर शिबिराचे उद्घाटन माजी आ. पंडित पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस तथा जि.प. सदस्य अ‍ॅड. आस्वाद पाटील, शेकाप महिला आघाडीप्रमुख नगरसेविका चित्रलेखा पाटील, जि.प. माजी अध्यक्ष प्रकाश धुमाळ, जि.प. सदस्या भावना पाटील, पं.स. सभापती प्रमोद ठाकूर, सदस्या रचना म्हात्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या रक्तदान शिबिरास शासकीय रक्तपेढी अलिबाग यांचे सहकार्य लाभले. यावेळी 35 रक्तबाटल्यांचे संकलन करण्यात आले. त्याबद्दल जिल्हा रक्तपेढीतर्फे अ‍ॅड. धुमाळ यांना गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या आरोग्य शिबिरात 112 रूग्णांणी शुगर व बीपी तपासणी मोफत करण्यात आली. तसेच कोरोना काळात काम करणार्‍या डॉक्टर्स, नर्सेस आणि मेडिकल वर्कर्स यांचा व महाड महापुरात मदत करणार्‍या मंडळांचा कोरोनायोद्धा म्हणून सत्कार करण्यात आला. या शिबी यशस्वी करण्यासाठी श्रीगणेश क्रीडा मंडळ तसेच इतर सहकार्‍यांनी परिश्रम केले.

Exit mobile version