। वाघ्रण । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील वाघ्रण येथील रायगड भूषण पत्रकार दिपक यशवंत पाटील संपादीत रायगड मिञ या यंदाच्या तेराव्या दिवाळी अंकाचे प्रकाशन शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते राज्य सरचिटणीस विधान परिषदेचे सदस्य राजि म बँकेचे अध्यक्ष आमदार भाई जयंत प्रभाकर पाटील यांच्या हस्ते सोमवार दिनांक २४ ऑक्टोबर २० २२ रोजी पेझारी येथे करण्यात आले. यावेळी माजी आमदार शेकापचे नेते पंडीत पाटील, जि.प. सदस शेकाप प्रतोद, जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, जि.प सदस्या भावना ताई पाटील, झेप फाऊंडेशन अध्यक्षा महीला आघाडी प्रमुख जि.प. सदस्या डॉ. चित्रा पाटील, अलिबाग अर्बन बँक अध्यक्षा सुप्रियाताई पाटील, आदी मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी शेकाप महीला आघाडी प्रमुख पी.एन पी एज्युकेशन संस्थेच्या प्रमुख कार्यवाह व अलिबाग नगर परिषद सदस्या चित्रा पाटील तथा चित्रलेखा पाटील यांनी संपादक दिपक यशवंत पाटील यांचे अभिनंदन केले. संपादक दीपक पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन मान्यवर प्रमुखांचे स्वागत करून दिवाळी निमित्त शुभेच्छा दिल्या, तर वाघ्रण पेझारी भाकरड पेढांबे सातघर चरी येथील प्रकाशनाला आलेल्या कार्यकत्यानी मान्यवर नेते मंडळीशी संवाद साधला. यामध्ये माजी सरपंच उदय पाटील, हरिश्चंद्र पाटील, ग्रां.प सदस्य रुपेश पाटील, किशोर पाटील सर पेझारी, श्रीकांत पाटील प्रतिनीधी पनवेल, पत्रकार जीवन पाटील यांच्या सह दयानंद म्हाये, संजय पाटील, पेढांबे ग्रा.पं. कार्यकर्ते रुपेश पाटील, छाया चित्रकार अजित पाटील, विवेक पाटील, निशांत पाटील, आणि क्षितिज पाटिल इत्यादी उपस्थित होते.