। अलिबाग । प्रतिनिधी ।
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त एलएसपीएम महाविद्यालय चोंढी, जेएसएम कॉलेज अलिबाग, पी.एन.पी कॉलेज वेश्वी यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या महाविद्यालयात 25 फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात पंचक्रोशीतील एकूण 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच, 27 जणांनी हिमोग्लोबिनची चाचणी केली.
या रक्तदान शिबिरासाठी अलिबाग येथील जिल्हा रुग्णालय रक्तपेढीतील डॉ. गोसावी आणि त्यांच्या संपूर्ण युनिटचे सहकार्य लाभले. यावेळी जे.एस.एम.कॉलेजचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रविण गायकवाड, प्रा. आठवले तसेच पी.एन.पी कॉलेज च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मिलिंद घाडगे उपस्थित होते. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रविंद्र ठाकूर तसेच सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाच्या प्राचार्या लीना पाटील यांचे सहकार्य लाभले. या रक्तदान शिबिराचे नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. सचिन गोंधळी व प्रा. प्रवेश पाटील यांनी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक सुरक्षा थळे, पियुष वर्तक, वैष्णवी घरत, अनिषा पाटील, सई राणे, नेहा पाटील, रिया म्हात्रे यांनी केले.