बुरुड समाजातर्फे रक्तदान शिबीर उत्साहात

नगराध्यक्षांसह मान्यवरांची उपस्थिती
अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
आपण ससाजाचे देणे लागतो या भावनेने अलिबाग तालुका बुरुड समाजातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन शुक्रवार, दि. 20 ऑगस्ट रोजी श्री समर्थ कृपा हॉल, भाग्यलक्ष्मी हॉलच्या शेजारी, श्रीबाग नं. 2 अलिबाग येथे करण्यात आले होते. यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, नगरसेवक प्रदीप नाईक, सुरक्षा शहा, संजना किर, प्रिया घरत आदी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात 30 रक्ताच्या पिशव्या जमा झाल्या. यावेळी रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थितित नागरिकांचे व समाज बांधवांना मार्गदर्शन करताना नगरसेवक प्रदीप नाईक म्हणाले, कोरोनामुळे भारत देशच नाही, तर संपूर्ण जग संकटात सापडले आहे. आपण कोरोनाच्या पहिल्या व दुसर्‍या लाटेसह अनेक संकटांवर मात करुन सामोरे गेलो. परंतु, कोरोनाची तिसरी लाट पण येईल, असा इशारा देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत रक्तदान शिबिराचे आयोजन करणे अतिशय मोलाचे ठरते.
यावेळी अलिबाग तालुका बुरुड समाजातर्फे सर्व पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बुरुड समाजाला सभागृहासाठी जागा मिळवून द्यावी, अशा विनंतीचे निवेदन समाजाच्या वतीने नगराध्यक्षांना देण्यात आले.
यावेळी रायगड जिल्हा बुरुड समाज अध्यक्ष रुपेश जामकर, अध्यक्ष संजय मोरे, उपाध्यक्ष अजय करंबत, कार्याध्यक्ष आरती करंबत, उपसचिव मनिषा करंबत, खजिनदार उमेश करंबत, उपखजिनदार ऋतुजा जामकर, सल्लागार कल्पेश करंबत, निलेश गाडे, चंद्रशेखर सोनकर, हिशोब तपासणीस कल्पेश महाले, जितेंद्र महाले, सुनील खैरे, अशोक करंबत, सुधीर नागे व इतर तालुकाध्यक्ष, प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version