रक्तदान करून वाचवला आदिवासी महिलेचा जीव

सागर शेळके, प्रवीण ठाकरे यांची सामाजिक बांधिलकी
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायत हद्दीतील वाघ्याचीवाडी येथील महिला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहे. तिला रक्ताची अवश्यकता भासली होती. परंतु कुठेही रक्तसाठा उपलब्ध होत नव्हता. ही बाब महिलेच्या नातेवाईकांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सागर शेळके यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सागर शेळके यांनी एका ब्लड बँकेशी संपूर्ण साधला, परंतु तिथेही रक्तसाठा उपलब्ध होत नव्हता.
त्यानंतर सागर शेळके यांनी रक्तगट कोणता आहे. याची विचार केली. तो समजल्यावर सागर शेळके आणि प्रवीण ठाकरे यांनी स्वतः पनवेल येथील रुग्णालयात जाऊन त्यांनी स्वतः त्या महिलेला रक्त दिले. त्यामुळे सागर शेळके व प्रवीण ठाकरे यांच्या योगदानामुळे त्या आदिवासी महिलेचा जीव वाचल्यामुळे महिलेच्या नातेवाईकांनी सागर शेळके यांनी प्रवीण ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

माणूस कोणत्या जाती धर्माचा आहे, कोणत्या पक्षाचा आहे. यापेक्षा त्याला रक्ताची गरज आहे. आम्ही निस्वार्थ भावनेतून केलेल्या रक्तदानामुळे महिलेचा जीव वाचला वाचला आणि महिलेच्या नातेवाईकांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून आम्हाला आत्मिक समाधान वाटले.

सागर शेळके, सामाजिक कार्यकर्ते
Exit mobile version