लाचखोर मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

। उरण । प्रतिनिधी ।

एमटी कंटेनर यार्डवर कारवाई न करण्याकरिता तक्रारदाराकडून लाच घेताना मंडळ अधिकारी संदीप रोडे यांना एसीबीने रंगेहाथ पकडून अटक केली आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उरण तालुक्यातील जासई येथील मंडळ अधिकारी संदीप रोडे (57) यांनी एमटी कंटेनर यार्डवर कारवाई करू नये म्हणून तक्रारदाराकडे 25 हजार रुपये लाच मागितली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे संदीप रोडे यांना नायब तहसिलदार म्हणून बढती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी उरणमधील पदभार दि. 4 जुलै रोजी सोडला होता. परंतु ज्याठिकाणी नायब तहसिलदार म्हणून नियुक्ती झाली होती तेथे हजर झाले नसल्याचे अधिकृत सूत्राकडून समजते.

त्यानुसार पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक ज्योती देशमुख यांच्या पथकाने सापळा रचून रोडे यांना 20 हजार रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

Exit mobile version