करंजा बंदरात बोटीला आग


| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील मच्छिमार बंदर म्हणून नावलौकीक असलेल्या करंजा-नवापाडा येथिल बंदरावर उभ्या असलेल्या बोटीला मंगळवारी (दि.19) सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास भिषण आग लागली. या आगीत ही बोट पुर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमारांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे या आगीची झळ येथे उभ्या असलेल्या दुसऱ्या बोटींना बसली नाही. जळालेली ही बोट अर्धवट बांधलेल्या अवस्थेत होती. दिपराज नाखवा यांच्या मालकीची ही बोट होती. बोटीचे बांधणी चालु असताना दिपराज नाखवा यांचे निधन झाल्यामुळे या बोटीची बांधणी थांबली होती. मंगळवारी बोटीवर काहीतरी काम सुरू असताना या बोटीने पेट घेतला.

Exit mobile version