झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वावंजे गावात झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आला आहे. या अनोळखी मयत पुरुषाचे वय 45 ते 50 वर्ष असून याने 10 ते 15 दिवसापूर्वी पंचाच्या साहाय्याने अशीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. नाझ इंडस्ड्रीजच्याजवळ वावंजे तालुका पनवेल जिल्हा रायगड या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला. सदर इसमाने अंगात नाइकचा काळ्या रंगाचा हाफ बाहांचा टी शर्ट, निळ्या रंगाचा बर्मुडा, काळ्या रंगाची कॅप, पायात तपकिरी व काळे पट्टे असलेली चप्पल घातलेली आहे. अनोळखी मयत इसमाचे वय 45 ते 50 वर्ष असून याने 10 ते 15 दिवसापूर्वी पंचाच्या साह्याने अशीच्या झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली आहे. या इसमाच्या नातेवाईकांचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत असून याबाबत कोणाला माहिती असल्यास त्यांनी पोलीस ठाणे किंवा सहा पोलीस निरीक्षक अर्चना कुदळे यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version