। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरात गळफास घेतलेल्या अवस्थेत एका इसमाचा मृतदेह आढळून आला असून त्याच्या नातेवाईकांचा शोध पनवेल शहर पोलीस करीत आहेत. मृत इसमाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्षे, रंग सावळा, उंची 5 फुट 5 इंच, डोक्याचे केस काळे वाढलेले, दाढी वाढलेली, चेहरा उभट, अंगाने मध्यम असून, अंगात आकाशी रंगाचा इंग्रजी अक्षर लिहिलेला फुल बाह्याचा टी-शर्ट व काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट तसेच पायाच्या पंज्याजवळ त्वचारोगाने झालेल्या जखमा आहे. या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे- 022-27452333 किंवा सहा.पो.राजरत्न खैरणार यांच्याशी संपर्क साधावा.